*शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने बळीराज्याचया डोळ्यातून आसवांचा पुर*
=========================================
केज ,(प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातीलसह केज तालुक्यामध्ये परतीचा पाऊस जोरदार पडल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात आतोनाक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी आता गावपातळीवरच करण्यात येत असुन याचा पहिला प्रयोग नुकताच सरपंचाच्या वतीने केज तालुक्यातील काळेगांवघाट येथे सुरू करण्यात आला असुन. दि.१५ आँक्टोबर रोजी सरपंच आगे व शेतकरी अविनाश दिगंबर गिराम यांच्या शेतात कळेगांवघाट येथील ऊसाच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली . मोठ्या प्रमाणावर ऊसाचे नुकसान झाले असुन ऊसाचे पिके भुईसपाट झाले आहेत.
यंदाच्या वर्षी दि.१० आँक्टोबर पासून सुरू झालेल्या परतीच्या पाऊसाने बीड जिल्ह्यासह केज तालूक्यात अतिवृष्टी व मोठ्या स्वरूपात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हे वर्षभर केलेले कष्ट अक्षरशः पाण्यात गेल्याने शेतक-याच्या डोळ्यातून आता आसवांचा पुर वाहु लागला आहे. नुकसान झालेल्या पिकामध्ये सोयाबीन, ऊस,तुर, बाजरी,कापुस यासह सर्व पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी काळेगावघाट येथील सरपंच यांच्यावतीने दि.१५ आँक्टोबर २०२० रोजी शिवारातील अतिवृष्टी व पाऊसामुळे नुकसान झालेल्या बाजरी, कापूस ऊस आदी.पिकाच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्यशेंगा, तुर, कापासाची फुटलेली बोंडे मातीमोल झाली, ऊस जमीनीवर लोळुन नुकसान झाले असल्याचे नुकसान ग्रस्तशेतक-यांनी आपल्या व्यथा मांडलया.यामध्ये शेतक-यांचे लाखो रूपयाचे झाले असल्याने आता पंचनाम्याचा विचार न करता शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी काळेगावघाट येथील विजयकुमार काळे, अविनाश गिराम, गणेश इतापे,ईत्यादी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे..
सोबत फोटो.
COMMENTS