प्रा.दारमोड यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्याचे भूमिपुत्र, जनसेवा प्रतिष्ठाण संस्थापक अ...
प्रा.दारमोड यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न
धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्याचे भूमिपुत्र, जनसेवा प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध व्याख्याते नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांचा प्रेमाचा गारवा हा कवितासंग्रह साहित्यिक श्री ना.सा.येवतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच ई-साहित्य प्रकाशन संस्थेकडून ऑनलाइन प्रकाशित झाला असून यावेळी वि.भ.वि.प.नांदेड जिल्हाध्यक्ष संगम लांडगे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव किरण पडलवार, हिंदी अध्यापक संघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रा.संजय देशमुख सह आदींची उपस्थिती होती. प्रा.दारमोड यांच्या साहित्य क्षेत्रातील पदार्पणाबद्दल तसेच नवीन कवितासंग्रहाबद्दल सर्वच क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
COMMENTS