नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नायगाव पंचायत समिती कार्यालयात मद्य प्राशन करून उशिरा येणाऱ्या व मोबाईल बंद करून न सांगताच निघून जाणाऱ्या बांधकाम विभागाचे अभियंता एम.ए. जिरवनकर यांना नायगांव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी फांजेवाड यांनी करणे दाखवा नोटीस बजावली असून 24 तास उलटले तरी खुलासा न देणाऱ्या या वादग्रस्त अभियंत्यावर काय कार्यवाही केली जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नायगांव प.स.कार्यालय गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी यांच्या गैरवर्तुनुकीने वागण्याच्या पद्धतीने चर्चेत आले आहे.मोबाईल चोर कर्मचारी व मद्य प्राशन करून धिंगाणा घालणारे कर्मचारी यामुळे हे कार्यालय नेहमी चर्चेत राहिले आहे.
बांधकाम विभागाचे अभियंता मद्य प्राशन करून नोकरीवर उशिरा दुपारी एक वा आले असल्याची बाब माजी प.स.सदस्य शिवाजी गायकवाड यांनी नूतन गट विकास अधिकारी फांजेवाड यांना 28 ऑक्टोबर 2020 रोजी उघडकीस आनून दिली.
या वरून चौकशी करण्यासाठी जिरवनकर यांना बोलावले असता मेडिकल होणार या भीतीने मोबाईल बंद करून पळून गेलेल्या अभियंत्यास दि.28 ऑक्टोबर रोजी जा.क्र.1442 खालील प्रमाणे नोटीस बजावली आहे
कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहता उशिरा आल्यामुळे कार्यालयीन कामे करण्यासाठी आडचणी निर्माण झाल्या. सकाळी ११ वा.कार्यालयात हजर राहणे बंधनकारक असताना दुपारी १.०० वाजता कार्यालयात हजर होणे ही बाब गंभीर स्वरूपाची आहे असे जिरवनकर यांना दिलेल्या नोटीसीत गट विकास अधिकारी यांनी म्हंटले आहे.
माजी प.स.सदस्य शिवाजी गायकवाङ माजंरमकर यांनी आपणास कामानिमित्त अनेक वेळा फोन केला तो आपण उचलला नाही. व कार्यालयात मद्यपान करून आला आहेत, असे की गायकवाड यांनी तक्रार केली असून
उशिरा दुपारी 1.00 वाजता कार्यालयात येणे व कामा विषयी विचारणा करने साठी बोलावले असता वरिष्ठांना न सांगता निघून जाणे व मोबाईल बंद करून ठेवणे हे वर्तन बरोबर नाही.या बाबद 24 तासात खुलासा द्यावा अन्यथा आपल्या वर कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस गट विकास अधिकारी पी पी फांजेवाड यांनी जिरवनकर यांना दिली आहे.
दिनांक 29 रोजी गटविकास अधिकारी फांजेवाड यांना संपर्क केला असता घटनेला त्यांनी दुजोरा दिला असून नॉटिसला उत्तर नाही आल्यास कार्यवाही होणार असे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
COMMENTS