मादळमोही दि,१(प्रतिनिधी ) महाराष्ट्रात कोरोणामुळे जे संकट उद्भवलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याला,भाजी पाल्याला,दुधाला व इतर कोणत्याच मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी पुर्णतः उध्वस्त झालेला आहे.सध्या जानवराचा बाजारभाव,त्याला लागणारा चारा व मेहनत या सगळ्या बाबीचा विचार करता शेतकऱ्याला साध्या दुधाचा भाव परवडत नाही.त्यामुळे सरकारने गाईच्या दुधाला किमान 35 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लोकप्रिय खासदार प्रीतम ताई मुंडे व बाळासाहेब दोडतले यांच्या आदेशानुसार व मा. जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार येथे दुध दरवाढीसंदर्भात गोपीनाथ मुंडे चौकात आघाडी सरकार विरोधात तीव्र घोषणा देऊन भारतीय जनता पार्टी व रासपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामरावजी खेडकर,पं.समिती सदस्य प्रकाश खेडकर,जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे,भाजपा तालुका सरचिटणीस इंजिनीयर एम.एन.बडे,किशोरजी खोले,रासपा जि.युवा उपाध्यक्ष ठकाजी कोळेकर,रासपा ता.अध्यक्ष मॅचिंद्र शिंगाडे, ज्ञानदेवआण्णा केदार,सरपंच देवा गरकळ,उपसरपंच गणेश येवले,माऊली पानसंबळ, सावळेराम जायेभाये,विक्रम सोनसळे, ज्ञानेश्वर काळे,अर्जुन कोळेकर, माऊली यमगर,कृष्णा यमगर,अभिलाष पाटील गाडेकर आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्तीत होते.
COMMENTS