*
माजलगाव (प्रतिनिधी)
येथील म.शि. प्र. मंडळाच्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी कोविड 19 च्या नियमांचे पालन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.पी पवार होते तर पत्रकार पुरुषोत्तमजी करवा, डॉ. एम. ए.कव्हळे, उपप्राचार्य प्रकाश गवते,उपप्राचार्य पवन शिंदे,प्रा बालाजी बोडके,प्रा. डॉ इप्पर, प्रा. सुदर्शन स्वामी, प्रबंधक प्रशांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.पत्रकार पुरुषोत्तम करवा यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर प्रा. डॉ. एम.ए. कव्हळे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ.एम. ए. कव्हळे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपले आयुष्य कष्टकऱ्यांसाठी, तळागाळातील शोषितांसाठी खर्ची केले. त्यांच्या साहित्यांची पात्रे काल्पनिक नसून त्यांचे वास्तव जीवनानुभव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेले आहेत. म्हणून वास्तववादी लेखक म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. अण्णाभाऊंचे साहित्य, त्यांचे जीवन, त्यांनी कामगारांसाठी केलेले कार्य, ह्या सर्वांमागे त्यांची व्यवस्था परिवर्तनाची विचारसरणी या सर्वांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगले पाहिजेअसे सांगून त्यांनी लो. टिळक यांच्या कार्यावरही प्रकाश टाकला.फेसबुक लाईव्ह च्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापकांनी घेतला.
COMMENTS