साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार - धनंजय मुंडे


 


परळी (दि. ०१) ---- : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत आपण त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


 


 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे. तसेच राज्य सरकारने केंद्राकडे याबाबतचा ठराव पाठवावा याबाबत आपण मागणी व पाठपुरावा करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 


 


पीडित - शोषितांचा आवाज आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे थोर समाजसेवक, लेखक - कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज शंभरावी जयंती. त्यांच्या विचारांचा वारसा आपण त्यांचे सच्चे अनुयायी बनुन अखंडपणे तेवत ठेवू. साहित्यरत्न यांना भारतरत्न देण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करणार आहे, असे यावेळी ना. मुंडे यांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओ मध्ये म्हटले आहे. 


 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाईल याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.


टिप्पण्या
Popular posts
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
मुंबई टांकसाळ कंपनीतील मान्यतेच्या निवडणुकीत मजदूर सभेचा दणदणीत विजय
इमेज
मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे लोकार्पण*
इमेज