ड्युटी वरुन परतताना अपघातात होमगार्ड जखमी


 


 दिंद्रुड प्रतिनिधी 


 


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशन अंतर्गत तेलगाव येथे नाकाबंदी साठी रात्रपाळी ची ड्युटी करुन परतताना मोटार सायकल स्वार होमगार्ड चा अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटे बीड-परळी हायवेवर संगम स्टेज नजदीक घडली.  


 


  उमेश मायकर रा. जहागीर मोहा ता.धारुर हे जखमी होमगार्ड चे नाव आहे. तेलगाव चौकात शुक्रवारी रात्री नाकाबंदी करण्यात आली होती.रात्रभर जागरण झाल्याने मोटार सायकल वरील ताबा सुटल्याचा प्राथमिक माहिती असुन संगम येथिल व्यायाम करण्यासाठी बाहेर आलेल्या युवकांनी अपघातात जखमी युवकास तात्काळ उचलुन दिंद्रुड पोलिसां मार्फत माजलगाव येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
मुंबई टांकसाळ कंपनीतील मान्यतेच्या निवडणुकीत मजदूर सभेचा दणदणीत विजय
इमेज