राजुरा येथिल आरोग्य केंद्रात रोजनदारीवर ठेवलेला सेवक कोरोना पाॕझिटिव्ह ....


 


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


       नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राजुरा (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या कृपादृष्टीने ओपीडी विभागात रूग्णांची नोंदणी करण्यास असलेला रोजनदारीवर उंद्री येथील एक नवतरूण कोरोना बाधीत झाल्याच्या बातमीने राजुरा परीसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण तिन महिन्यापासुन कामास होता खोकला ताप सर्दी या आजाराने गृस्त असतानाही राजुरा आरोग्य केंद्रात सेवेत असल्याचे बोलल्या जात होते. जाहूर येथे कोरोणा रूग्णांची संख्या आता आठ झाली आहे. हा उंद्री येथील तरून या रुग्णांच्या संपर्कातून कोरोणा बाधीत झाल्याची चर्चा आहे. 


         ही बाब राजुरा आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली असताही निष्काळजीपणाचा कळस गाठत अनेकांच्या जीवाशी खेळ खेळत आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले होते. २९ जुलै रोजी एकूण सात स्त्रियांची नोंदणी ही करण्यात आली होती आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पूर्व तयारीनिशी यंत्रणा सज्ज झाली होती. शस्त्रक्रियेआधी उपाशीपोटी ठेवून इंजेक्शन व इतर औषधे देऊन स्त्रियांना तयार ठेवण्यात आले होते. मात्र जीथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या सोईसाठी ठेवण्यात आलेल्या तरूणाला कोरोना झाल्याची बातमी राजुरा सह परिसरात वाऱ्यासारखी पसरली परंतू काहीच झाले नसल्याचा आव आणत येथील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणावर पांघरून घालून ठेवल्याचे लक्षात येताच राजुरा प्रार्थमिक आरोग्य केंद्रभर संपर्कात असलेल्या या तरूणाला कोरोणा आजार झाल्याचे लपवून ठेवलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी आलेल्या स्त्रियांनी अनेक प्रश्ननांचा भडीमार करत आरोग्य केंद्रात कोरोणा रूग्ण आढळला असताना हे शस्त्रक्रियेचे आयोजन का केले असे विचारले असता डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरं देत शस्त्रक्रिया शिबीर रद्द करून काढता पाय घेतल्याने आरोग्य केंद्रात एकच गोंधळ उडाल्याने डॉक्टरांच्या बालिश वृत्तीचे चित्र पाहवयास मिळत आहे. 


       राजुरा परिसरात हे आरोग्य केंद्र सर्वसामान्यांसाठी एक म्हत्वाचे आरोग्य केंद्र असून येथे या आधी एक कर्तव्य दक्ष डॉक्टर कार्यरत असताना सर्व सोईसुविधेसह औषध उपचार मिळत असल्याने रूग्णांची नेहमी गर्दी असायची. प्रसुती व कुटुंब नियोजनासाठी राजुरा परिसरासह दूर दुरुन रुग्ण येत होते. अनेक अनुभवी योग्य निदान करत सेवा देणारे डॉक्टर येथे कार्यरत होते. या आरोग्य केंद्रा अंतर्गत उपकेंद्रासह एकूण ३९ गावे असलेल्या आरोग्य केंद्राचे सध्या चित्र बदलले आहे. राजुरा परिसरातील जनतेसाठी एक उत्तम असे आरोग्य केंद्रा म्हणून सोईचे होते पण आज घडीला औषध उपचाराअभावी या आरोग्य केंद्राची अवकळा झाल्याने आरोग्य केंद्रच आजारी झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यातच कोरोना सारख्या जीव घेण्या आजाराला खेळ समजल्या जाणाऱ्या अशा बेजबाबदार डॉक्टरांच्या वागणुकीमुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी त्यांची त्वरीत बदली करून राजुरा प्रार्थमिक आरोग्य केंद्राला पुन्हा ते दिवस आणावेत अशी विनंती राजुरा परीसरातील जनतेतून होत आहे.


-----------------------------


राजुरा (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजनदारीने कामावर ठेवलेला तरूणाचा रिपोर्ट अहवाल कोरोना पाॕझिटिव्ह आला आहे.आरोग्य केंद्रात सेवकाची कमतरता आहे....त्या मुळे आम्ही उंद्री येथिल तरूणांची रोजनदारीवर नियुक्ती केलेली होती . आरोग्य केंद्रातील रोजनदारीवर ठेवलेल्या सेवकाचा रिपोर्ट पाॕझिटिव्ह आल्यामुळे २९ जुलै चा शस्त्रक्रिया शिबिर रद्द करण्यात आला...


 


   डॉ.विलास धनगे ....


वैद्यकीय अधिकारी प्रा.आरोग्य केंद्र राजुरा (बु) 


----------------------------------


टिप्पण्या