जोशींचीतासिका

*टेन्शन काए को लेने का? चिंता नाही; एकमेकांची काळजी करा आणि स्वतःची काळजी घ्या*



#जोशींचीतासिका


 


१. परळी वैजनाथचे कॊरोनामीटर वाढत आहे हे आकड्यांवरून वाटतं असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.


 


२. मृत्यूदर हा वैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांमुळे व प्रभू वैद्यनाथ कृपेने खूपच कमी आहे.


 


३. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थांच्या अहवालानुसार शीतज्वर (Influenza A) मध्ये मृत्यूदर सुमारे ६०%, टीबी रुग्णांचा मृत्यूदर ४३%, डेंग्यूमध्ये सरासरी २६% रुग्ण दगावतात हे सर्रास आपल्या आजूबाजूला असणारे आजार आणि त्याचे मृत्यूदर आहेत. त्यामानाने कोरोनाचा सुमारे ३ ते ४ टक्के मृत्यदर हा अत्यल्प आहे.


 


४. मीडियाच्या प्रक्षोभक वार्तांकनास अजिबात बळी पडू नका. कोरोनाचा स्फोट, कोरोनाचे थैमान, कॊरोना फोफावला आदी बातम्या देणाऱ्यांचे पानं त्यांना सुरळी करून मागच्या खिशात घालून घ्या म्हणावं.


 


५. आवश्यक असेल तरचं घराबाहेर पडा.


 


६. ज्या पद्धतीने दररोज न चुकता पॅन्टखाली अंडरपॅन्ट घालता तसे मास्क तोंडाला लावणे अनिवार्य करून घ्या.


 


७. जसे जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे तसाच सॅनिटाईजरचा वापर तुमच्या जगण्यात अंतर्भूत करून घ्या.


 


८. अनेकजण लॉकडाऊनची मागणी करत आहेत. पण, ते कायमस्वरूपी सोल्युशन होऊ शकतं नाही. अर्थव्यवस्था कोलमडली तर नवीन गंभीर सामाजिक समस्या उत्पन्न होतील ज्या मध्ययुगीन जगाकडे किंवा आपल्याला अश्मयुगाकडे घेऊन जातील.


 


९. आज जवळपास संपूर्ण युरोप including tourist places पूर्ण जोराने सुरू झाले आहे. त्याचे कारण म्हणजे तिथल्या बहुतांश लोकांना कोरोनातही कसे जगायचे याचे आत्मभान आले आहे. सामाजिक सोवळे / सामाजिक शारीरिक अंतरपालन / Social Physical Distancing हा त्यांनी त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग अवलंबला आहे.


 


१०. वर दिलेले सर्व मुद्दे हे आपल्या सर्वांची चिंता कमी करावी म्हणून सप्रमाण दिलेले आहेत. याचा अर्थ "बिनधास्त उडाणटप्पूपणे" वागण्यासाठी नाहीत. जो कोणी असे करेल त्याला प्रशासनाने कायद्याने "टप्पू" द्यावेत असा माझा प्रस्ताव असेल.


 


Moral of the story : *टेन्शन काए को लेने का? चिंता नाही एकमेकांची काळजी करा आणि स्वतःची काळजी घ्या*


 


थोडक्यात आपले विचार आणि कृती आपण सकारात्मक ठेवून संकटाला संधीत आणि विकासात रूपांतरित करू; सोबतच कॊरोना नावाच्या मोठ्या मानसिक आणि छोट्या शारीरिक आजाररुपी भूताला निगेटिव्ह ठेऊ.


 


#Covid19 #CovidDiaries 


 


जय हिंद,


अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ


चलभाष क्रमांक : 8983555657


दि. २ ऑगस्ट २०२०


 


तळटीप:


 


१. आपल्या असहमतीशी सदैव सहमत आहे.


 


२. आपल्या सूचना, मार्गदर्शन आदींचे कायमस्वरूपी स्वागत.


 


३. अस्मादिक कोणतेही वैद्यकीय तज्ज्ञ नाहीत, फक्त काही जगमान्य वैद्यकीय अवहवालांचा अभ्यास करून माझ्या अल्पमतीनुसार केलेल्या निरीक्षणावरून प्रस्तुत मत मांडले आहे.


 


वर्तमानपत्र हे चौफेर असले पाहिजे त्याला अनुसरूनच जोशींची तासिका हे नवीन वृत्तमालिका सुरू करत आहोत तर जोशींची तासिका म्हणून काय विचारता तुम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जसं सकाळमध्ये टिंग टॉंग लोकसत्तामध्ये वृत्तमानस हे जसे सदर होते तसेच हे सदर समजा


संपादक


टिप्पण्या