*यंदा गणेश विसर्जन कृत्रीम तळ्यात करावे : प्रा. अतुल दुबे शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख*


 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) यंदा कोरोनाच्या संकटात गणेश उत्सव साजरा होईल. २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे तर १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्याअनुषंगाने यावर्षी गणेश विसर्जन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा कृत्रीम तलाव व्यवस्था तयार करावी अशी पर्यावरणपूरक मागणी शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख प्रा. अतुल दुबे यांनी आज नगरपरिषदेकडे केली आहे


 


दरवर्षी मार्कंडेय तीर्थ, हरिहर तीर्थ किंवा आसपासच्या गावांतील तलावात गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते. काही जणांच्या धार्मिक भावना ह्या दुखावतील पण धर्मशास्त्रातसुद्धा पाण्याचे संवर्धन हे धार्मिक विधीपेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी व सामाजिक स्वास्थ्यासाठी कृत्रीम तलावात विसर्जन करावे असे आवाहन प्रा. अतुल दुबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.


टिप्पण्या