परळी वैजनाथ:-
परळी येथील उपविभागीय अधिकारी यांनी परळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना नोटिसा देऊन दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी सुनावणीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आज तहसील कार्यालयात शेतकरी व वकील यांची मोठी गर्दी झाली होती.वास्तविक तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात आजही कोरोनाच्या महामारीमुळे व शासनाच्या लाॅकडाऊनमुळे कोणतेही नियमित प्रकरण चालत नाहीत. अत्यंत तातडीचे प्रकरण केवळ सुनावणीसाठी ठेवण्यात येतात तेही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मार्फत. असे असतानाही अति महत्वाचे व तातडीचे प्रकरण नसतानाही दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून महसूल अधिकारी यांनी घेतलेले फेरफार प्रकरणाच्या नाराजीने उपविभागीय अधिकारी यांनी कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार नसतानाही स्वतःहून सदर प्रकरणे सुनावणी साठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.दिवाणी न्यायालयाचे निर्णय बदलण्याचा उपविभागीय अधिकाऱ्यांना हक्क आहे का अशी विचारणा ते वकील वर्गाला करत आहेत. सदर प्रकरण आज सुनावणीसाठी असल्यामुळे शेतकरी व वकील मंडळी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय येथे मोठ्या प्रमाणावर हजर होते. परंतु उपविभागीय अधिकारी हे इतर प्रशासकीय कारणास्तव बाहेर गेल्यामुळे शेतकरी वकील मंडळींना मनस्ताप सहन करावा लागला. वास्तविक तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी कोरोना बाधित झालेले असतानाही अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्यावर तो भाग कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर करून इतरांना तेथे प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध केला जातो.परंतु महसूल अधिकारी नोटिसा काढून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बोलावून महसूल प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येत आहेत ते शेतकऱ्यांच्या वकिलांच्या आरोग्याला घातक आहे व ही अत्यंत गंभीर बाब आहे. करिता महसूल प्रकरणी लाकडांच्या काळामध्ये महसूल प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येऊ नये अशी मागणी वकील संघाचे अध्यक्ष श्री.अॅड. पी.एम.सातभाई अँड.व्हि.बी.नागरगोजे श्री.अॅड.डि.जी.स्वामी अँड.जीवनराव देशमुख ऍड हरिभाऊ गुट्टे अॅड अनिल मुंडे श्री.अॅड.माधवराव मुंडे अॅड.प्रकाश मराठे श्री.अॅड.एम.जी.मिर्झा अॅड.डि.एल.उजगरे अॅड.व्हि.एस.फड अॅड. आर.व्ही.गित्ते.अँड. अँड.डि.पी.कडबाने अँड.प्रदिप गिराम.अँड.मोहन कराड अँड.जगन्नाथ आंधळे अँड लक्षमण अघाव अँड.पोतदार अँड.कल्याण सटाले अँड.मार्तंड शिंदे अॅड.लक्षमण गित्ते अँड.लक्ष्मीकांत मुंडे अॅड.एस.एम.गित्ते अॅड.डि.एस.उजगरे श्री.अॅड.एस.एम.मुंडे अँड.ज्ञानोबा मुंडे अँड.श्रीकांत कराड अँड.गजानन पारेकर अँँड. सायस मुंडे.अँड.सुनिल सोनपीर अँड.अँड.वाय.आर.सय्यद. अॅड आबासाहेब सोळंके अँड.इम्रान खान अँड.राहुल सोळंके अँड.केशव अघाव अॅड.दिनकर वाघमोडे अॅड.धनाजी कांबळे अँड.बालाजी कराड जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.
COMMENTS