परळी येथे वास्तव्यास असलेल्या सत्यभामा व सुनील शिरूरे या पतीपत्नीचे अवघ्या 6 तासात ब्रेन हॅमरेजसह हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन*


 


 


 


अंबाजोगाई (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील मूळ रहिवासी व मागील काही वर्षा पासून परळी येथे वास्तव्यास असलेले सुनील शिरूरे व त्यांच्या पत्नी सत्यभामा शिरूरे या दोघा पतीपत्नीचे अवघ्या 6 तासात ब्रेन हॅमरेज सह हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


  


या विषयी सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या नळेगाव येथील मूळ रहिवासी असलेले सुनील शिरूरे यांची सासरवाडी परळी नजीक नाथ्रा येथील असल्या कारणाने मागील काही वर्षा पासुन ते आपल्या कुटुंबियांसह परळी येथे राहून वैद्यनाथ मंदिर येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत होते.


 


नाथ्रा येथील गणपतराव काळे यांचे जावई असलेले सुनील शिरुरे यांच्या पत्नी सौ सत्यभामा सुनील शिरूर (वय वर्ष 55) यांना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका व ब्रेन हॅमरेज झाले त्या मुळे त्यांना सर्वप्रथम एका खाजगी रुग्णालयात दाखवुन त्या नंतर आंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच्या हेतूने अम्ब्युलेन्स मध्ये टाकुन हलवण्यात आले.


   


त्या नंतर अवघ्या काही वेळात हा सर्व प्रकार पाहुन पती सुनील शिरुरे (वय वर्ष 60) यांनाही तोच प्रकार झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ब्रेन हॅमरेज झाले व ते खाली कोसळले. पत्नी पाठोपाठ पतीलाही स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्या साठी पाठवण्यात आले.      


  


उपचार सुरू असतानाच काल पहाटे पत्नी सत्यभामा शिरुरे यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे शव लागलीच नाथ्रा या ठिकाणी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करून लोक परत येतात न येतात तोच पती सुनिल शिरुरे यांची सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवल्याची वार्ता त्यांच्या कानावर आली. त्या नंतर त्यांच्यावर ही नाथ्रा या ठिकाणी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.


   


सर्वांच्या मनाला चुटकी लावून गेलेल्या या दुःखद घटनेने परळी येथील गुरव समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन त्यांच्या पश्चात दत्तात्रय शिरुरे चित्रकला शिक्षक व लखन शिरुरे फोटो ग्राफर ही दोन मुले व एक सुन असा परिवार आहे. शिरूर व काळे परिवारावर फार मोठा आघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यपरळी येथे वास्तव्यास असलेल्या सत्यभामा व सुनील शिरूरे या पतीपत्नीचे अवघ्या 6 तासात ब्रेन हॅमरेजसह हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन*क्त होत आहे.


टिप्पण्या