रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने  साहित्यसम्राट,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शताब्दी जन्मोत्सव साजरा....


 


 


अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक प्रवास आणि चळवळ मातंग समाजाने समजून घेणे आवश्यक आहे - भारत सोनकांबळे


----------------------------------


 


(नांदेड - विठ्ठल कल्याणपाड )


 


 


 


आजचा दिवस म्हणजेच १ ऑगस्ट १९२० ते १ ऑगस्ट २०२०, हे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०० वा जन्मशताब्दी वर्ष


आहे.मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली ६ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात, कधी वयोवृद्ध व्यक्तीसाठी मायेचा हात देत मोफत नेत्र तपासणी, विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम तसेच नुकतेच ७ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी महामाता, त्यागमुर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रमाई फाऊंडेशन यांच्या आयोजित सामाजिक चळवळीतील महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री ची महत्वाची भूमिका असते मथळ्याखाली


रमाई पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला होता. अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दत्ता सोनकांबळे व सचिव


भारत सोनकांबळे यांच्या माध्यमातून रमाई फाऊंडेशन बेटमोगरा ही संस्था विविध प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात अग्रेसर आहे. १ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० वा जन्मशताब्दी वर्षानिमित्त रमाई फाऊंडेशन च्या वतीने बेटमोगरा येथे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला रमाई फाऊंडेशन चे सचिव,पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भारत सोनकांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायानी अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक प्रवास आणि चळवळ मातंग समाजाने समजून घेणे आवश्यक आहे तसेच अण्णाभाऊंच्या लढ्याची,चळवळीची दिशा आणि नियोजन करुन व त्याच्या अंमलबजावणीसाठी सिद्ध होणे. हीच खरी अण्णा भाऊंना आदरांजली ठरेल असे यावेळी प्रतिपादन केले.


गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्व जगावर विपरीत परिणाम करत आज कोरोना आपल्या घरापर्यंत  येऊन पोहचला आहे.सर्वत्र भीतीचे वातावरण असताना आपणास या संकटाला खंबीरपणे सामोरे जायचे आहे.वेगवेगळ्या अफवा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचत आहेत.कुठल्या ही अफ़वावर विश्वास न ठेवता आपण या संकटाशी सामना करायचा आहे. त्यामुळे अण्णाभाऊंच्या वारसदारांनो,वारसदार त्यांना म्हणतात जे त्या महापुरुषांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करतात. एवढेच नाही तर प्रत्यक्ष त्या विचाराचे जीवन जगतात. केवळ आपल्या रक्ताचे,जातीचे होते म्हणून आपण कोणाचे वारसदार ठरत नाहीत. हाच सिध्दांत अण्णाभाऊंचा वारसा सांगणाऱ्यांना लागू होतो .परंतु भारतातील जाती व्यवस्थेने या सिध्दांताला पायदळी तुडवून परिवर्तनवादी विचाराच्या महापुरूषांना त्यांची जात चिकटवून जातीव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे षढयंत्र रचले आहे. हे आता अण्णाभाऊ साठे प्रेमी जनतेने समजून घेणे गरजेचे आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित हर्षदीप सोनकांबळे,प्रीतम सोनकांबळे, कु. करुणा सोनकांबळे,दीक्षा सोनकांबळे, रितेश सोनकांबळे, गंगासागर सोनकांबळे, कू.विश्वजीत सोनकांबळे, कु.संजना वाघमारे,आदींची उपस्थिती होती.


टिप्पण्या