कु .पुजा अमर तरटे ८३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम..


................


 


मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


मुखेड तालुक्यातील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक राजुरा (बु) विद्यालयाची विद्यार्थिनी कु .पुजा अमर तरटे रा .सांगवी ता .मुखेड ही ग्रामीण भागातील मुलगी प्रतिकूल परिस्थिती वर मात करून इयत्ता बारावी च्या परीक्षेत कला शाखेत ८३.६९ टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .कु .पुजा ही मोठ्या जिद्दीने अभ्यास करून बारावी परीक्षेत यश मिळवली तिच्या या यशाबद्द्ल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालया चे संचालक श्रीराम पाटील राजूरकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड ), मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजीराव पा.अंबुलगेकर, विद्यालयाचे प्राचार्य -रानशेवार व्ही .बी , शांती निकेतन आंबुलगा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरराव मामीलवाड ,प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उल्लिगडे, पोलिस पाटिल विठ्ठलराव कौरवाड ,आदीसह शिक्षकवृंद परिसरातील नागरिक यांच्या कडून कु.पुजा हिचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


टिप्पण्या