सेलू प्रतिनिधी
तालुका शिक्षण संघर्ष संघटना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित आणि 2005 नंतर 100% अनुदानित झालेल्या शाळा,वर्ग, तूकड्यावरील नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन चालू व्हावी याकरिता जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आ.मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांना मंगळवार दि. 28 जुलै रोजी निवेदन देऊन आंदोलन केले .
जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारण्यासाठी 10 जुलै 2020 रोजी असाधारण क्रमांक 153 प्राधिकृत प्रकाशन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 10 जुलै 2020 चे राज पत्राच्या अनुषंगाने अन्वयकारक काढलेली आधिसुचना रद्द करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांवर झालेला अन्याय दूर करावा. प्रशासनातील वरिष्ठ मंडळी विधान परिषदेच्या सभापती महोदयांच्या आदेशाची करीत असलेली अवहेलना यासंदर्भात शिक्षकांचा आवाज विधानसभा सभाग्रहात उठवण्यासाठी सेलू चे आ. मेघना दीदी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळे शिक्षण संघर्ष संघटना पदाधिकारी मुख्याध्यापक केशव टाकळकर, क्रीडा शिक्षक आर.बी. चव्हाण, दिलीप सुरवसे, सुनील गायकवाड, महादेव खरात, ईश्वर घोडके, विष्णू आंधळे, विठ्ठल आंबट, खाडे सर, वाव्हळ सर, डंबाळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
[: फोटो:- जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आ. मेघना दीदींना निवेदन देताना शिक्षण संघर्ष संघटना पदाधिकारी दिलीप सुरवसे , चव्हाण आर. बी. महादेव खरात, केशव टाकळकर, सुनील गायकवाड, ईश्वर घोडके, विठ्ठल आंबट, विष्णू आंधळे, खाडे सर, वाव्हळ सर, इत्यादी उपस्थित होते.
COMMENTS