शिवसेना धर्माबाद पोलीसांच्या मागे खंबीरपने उभी
धर्माबाद (अहमद लड्डा) शुक्रवारी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि नायगाव मातदरसंघचे आमदार राजेश पवार यांना धर्माबाद शिवसेने तर्फे निषेध करण्यात आला. धर्माबाद चे तहसीलदार व जिल्हा पोलिस अधिक्षकाना दिलेल्या निवेदनात हे नमूद केले आहे की २२ जुलै रोजी श्री उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेताना शेवटी जय हिंदू, जय महाराष्ट्र, जय भवानी आणि जय शिवाजी म्हणाले. परंतु राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे भोसले यांना म्हटले आहे की, हे घर नाही, हे माझे चेंबर आहे, अशी वागणूक जाहीर करू नका, ही वागणूक चुकीची आहे. या राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाला विरोध केल्यामुळे निषेध करण्यात आला. दुसर्या एका निवेदनात नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद पोलीस प्रशासनावर संशयाची भूमिका घेतल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. कोरोना संकटात उल्लेखनीय काम करूनही आमदार पवार पोलीसांचे कौतुक करण्याऐवजी पोलिसांची बदनामी करण्याचे काम करत आहेत, असे धर्माबाद शिवसेनेच्या पदधिकार्यांनी सांगितले व हे पण सांगितले की शिवसेना धर्माबाद पोलीसांच्या मागे खमबीरपने उभी आहे. दिलेल्या निवेदनावर तहसील शिवसेना प्रमुख गणेश गिरी, शहरप्रमुख राजू शिरमने, पंचायत समिती सभापती मारुती कागेरू, मनोजकुमार मनूरकर, सतीश माळगे, माधव कदम, गणेश दुद्दुलवाड आणि कांचने पुंडलिक यांच्या स्वाक्षर्या आहेत.
COMMENTS