सापडलेले 90 हजार किंमतीचे सोने महिलेने केले परत


 


माजलगाव/प्रतिनिधी


     पंचमी निमित्त माहेरी आलेल्या हिवरगव्हान ता वडवणी येथील सौ पूजा नाईकवाडे या महिलेचे 1तोळे व 7 ग्राम वजनाचे सोन्याचे गठन कापड दुकानात सापडल्या नंतर सोंनाथडी येथील अनिता सीताराम वगरे या महिलेने पोलिसांत आणून जमा केले.अनिता वगरे यांच्या प्रामाणिक पणा बद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे.


            हिवरगव्हान ता वडवणी येथील सौ पूजा नाईकवाडे या आपल्या माहेरी आनंदगाव येथे पंचमी सणा निमित्त आल्या होत्या. दि. 27 जुलै रोजी साडी खरेदी करण्यासाठी त्या शहरातील रामेश्वरी वस्त्र भांडार येथे आल्या होत्या.त्यांचे पावणेदोन तोळ्यांचे गंठन असलेली पर्स पाणी पितांना पडली.ती पर्स सौ अनिता वगरे याना सापडली आज सकाळी सौ अनिता वगरे यांच्या मुलांनी पोलीस ठाण्यात सदर पर्स दागिन्यासह आणून ए पी आय अविनाश राठोड यांच्या कडे जमा केली.सदर दागिने हरवल्याची तक्रार काल पूजा नाईकवाडे यांनी शहर पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी बीड रोड वरील एक दोन कापड दुकानातील सी सी टी व्ही फुटेज ही ताब्यात घेतले.परंतु तत्पूर्वीच सौ वगरे यांनी सदर दागिने पोलिसात जमा करून आपल्या प्रामाणिक पणाचा परिचय दिला.


टिप्पण्या