- व्यापारी महासंघाच्या अध्यक्षसह 5 व्यापाऱ्यांवर सोशल डिस्टन्स प्रकरणी गुन्हे दाखल
माजलगाव / भास्कर गिरी
सोशल डिस्टन्स चे कोणतेच नियम न पाळता कोविड 19 आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र रेदासनी सह 5 व्यापाऱ्यांवर पोलीस निरीक्षक बुधवन्त यांनी आज गुन्हे दाखल केले.दोन दिवसातील ही दुसरी कारवाई आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दुकानात गर्दी न करता अंतर राखून व मास्क लावून तसेच सॅनिटायझर वापरून व्यवसाय करायचा या सूचना देऊन जिल्हाधिकारी यांनी दुकाने सुरू करावयास परवानगी दिलेली आहे. असे असताना शहरातील अनेक कापड दुकानात या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून एका वेळेस अंदाजे 100-150 लोकांची गर्दी होत असते. याबाबत
काही दुकानदार यांना यापूर्वी समज देऊन सोडून दिले होते. यानंतरही अनेक दुकानांत नियमांचे उल्लंघन होत असल्याने दि. 9 जुलै गुरुवारी सायंकाळी पोनि.बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड,सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष शेटे, खिझर पाशा,
भास्कर राऊत, विनायक अंकुशे, दिलीप सरोदे यांच्यासह पथकाने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांच्या संजय ड्रेसेस, कुणाल ड्रेसेसचे रेकब मुदिया, समर्थ ड्रेसेसचे हनुमान शिंदे, जावेद तौफिक सिद्दीकी यांचे सैराट मोबाईल, दत्तात्रय गायकवाड यांचे पुना पावभाजी अशा पाच दुकानदारांवर गर्दी करून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188, 269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- हे कसले कोरोना योद्धा?
- एका सामाजिक संघटनेने व्यापारी महासंघाच्या अध्यक्षा ला 15 दिवसांपूर्वी कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले आणि दि.9 जुलै रोजी कोरोना च्या नियम पाळत नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.या वरून ते कोरोना योद्धा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
- व्यापारी महासंघाने पार्टी केली तेव्हाच सुटले...!
- 30 जून रोजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी नवीन बस स्थानक समोरील अनिल भोजनालय येथे पार्टी केली.सुमारे 30-40 व्यापारी या पार्टीत एकत्र आले होते हे सगळं अनिल भोजनालय च्या सी सी टि व्ही कॅमेऱ्यात कैद आहे.त्यावेळीच कारवाई झाली असती तर व्यापाऱ्यांचे धाडस वाढले नसते.व्यापारी महासंघाचे पदाधिकारी च सर्वात जास्त कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS