कोरोनातून १९ व्यक्ती मुक्त
एकूण करोनामुक्त – २३८
एकूण पॉझिटिव्ह – ३१७
नांदेड :- कोरोना आजारातून आज १९ व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील १४ व मुखेड कोविड केअर सेंटर येथील ५ बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २३८ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवार २२ जून रोजी प्राप्त झालेल्या एकुण ५९ अहवालापैकी सर्वच्या सर्व ४५ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन ८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तसेच आदिलाबाद येथून १ बाधित व्यक्ती हा नांदेड येथे संदर्भित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या ३१७ एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये पिरबुऱ्हानगर येथील २६, २९, ३१ वर्षाचे ३ पुरुष आणि भगतसिंग रोड येथील ५८ वर्षाचा १ पुरुष तसेच नांदेड तालुक्यातील पिंपळगाव येथील १८ व ३८ वर्षाचा २ महिला, चिखलभोसी ४५ वर्षाची १ महिला आणि रिसनगाव येथील १९ वर्षाची १ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत ३१७ बाधितांपैकी २३८ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत ६५ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील ४ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय ५० व ५२ वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात ६५ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४२, लोहा कोविड केअर सेंटर येथे २ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून ७ बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार २२ जून रोजी ५९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
- जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
- सर्वेक्षण- १ लाख ४६ हजार १२७,
- घेतलेले स्वॅब- ५ हजार ७४७,
- निगेटिव्ह स्वॅब- ५ हजार ३०,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १२,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३१७,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ०२ ,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- १४,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २३८,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६५,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची ५९ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS