- *शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, अशी घोषणा अनिल देशमुख यांनी आज केली.*
- मुम्बई प्रतिनिधी
प्रत्यक्षात, शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्या नावे 20 लाख कोटींचे पॅकेज वैगेरे सारा गवगवा केला जात असताना महाराष्ट्रात शेतकरी वाऱ्यावर आहे. जळगावात अनेक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा सहकारी बँक JDCC व इतर सरकारी, खासगी बँका शेती तारणावर कर्ज द्यायला नकारघंटा वाजवत आहे. शिवसेनेचे चिमणराव पाटील अध्यक्ष असतांना शेतीच्या 7/12 वर शैक्षणिक कर्ज देणारी JDCC आता शेतीवर कर्ज द्यायला नकार देतेय. सरकारी व इतर खासगी बँकाही राज्यात सर्वत्र शेतीच्या 7/12 वर कर्ज द्यायला तयार नाहीत. त्यांना NA झालेले प्लॉट किंवा व्यावसायिक भूखंड, बंगला तारण हवा. म्हणजे, एकीकडे कृषी प्रधान तुणतुणे वाजवायचे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिकायला शेतीवर कर्ज द्यायचे नाही, हे कसले धोरण? म्हणजे, शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचेच नाही का?*आम्ही वारंवार सरकारला सांगत आहोत आज गूहखात्याचे मंत्री अनिल देशमुख यांना सहकारमंत्र्यांना सांगावे लागत आहे त्यांनी मागील सरकारच्या विश्वासातील अधिकारी आपल्या सहकार खात्यात परत जशेच्या तशे परत घेतलेत ते लबाडेंद्र च्या इशाऱ्यावर आपल्या सरकारची व सहकार विभागाची पाळमुळ सैल करीत आहेत . गूहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत या पक्षाचे अध्यक्ष ना.शरद पवार साहेब सहकारातील तज्ञ आहेत , सहकार शेतकरी यांच्या समस्या ते जाणतात असे असताना गूहमंत्र्यांना सहकार विभागात गांभीर्याने लक्ष द्यावे लागत आहे.*
COMMENTS