मुम्बई भारत बरोबर महाराष्ट्र देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटाने वाढ होत आहे. जगात भारत चौथ्या स्थानी आहे. या सर्व देशांच्या यादीत मह...
मुम्बई
भारत बरोबर महाराष्ट्र देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटाने वाढ होत आहे. जगात भारत चौथ्या स्थानी आहे. या सर्व देशांच्या यादीत महाराष्ट्रानेही जागा मिळवली आहे.
महाराष्ट्रात 1 लाख 35 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जगात महाराष्ट्र 17 व्या स्थानी आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित आहेत.
कोरोना बळींच्या संख्येच्या बाबतीतही तिच स्थिती आहे.अनेक देशांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत. महाराष्ट्रात 6 हजार 283 बळी कोरोनाने घेतले आहेत. चीन, पाकिस्तान, टर्की , स्वीडन, हॉलंड, दक्षिण कोरिया, बांग्लादेशपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत.
COMMENTS