By Rajneta - June 23, 2020031
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक ग्राहकांना वीज बिलाचा ‘शॉक’ बसला आहे. आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले कि लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे; शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.
जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
नितीन राऊत म्हणाले!
लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही बिलं लॉकडाऊनमधील तीन महिन्याची आहेत. लॉकडाऊनमध्ये विजेचा वापर जास्त झाला.टीव्ही, फॅन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढतेच. दुसरी गोष्ट म्हणजे MERC ने एप्रिलमध्ये विजेचे दर वाढवले आहेत. ते दर लागू झाले आहेत. मागील वर्षीच्या या महिन्याच्या बिलाची आणि यंदाच्या बिलाची तुलना करुन पाहिली तरीही हे वीज बिल माफक आहे हे लक्षात येईल.
COMMENTS