मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण काल उत्साहात पार पडले.
या आरोग्य केंद्रासाठी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी अथक परिश्रम घेत मागील काळात माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत मंजूर झालेल्या कोट्यावधी रुपयांची भव्य इमारतीचे बांधकाम केले. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणाचे मुहूर्त ठरले असुन दि.११ फेब्रुवारी रोजी शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती डॉ.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज व मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते फित कापून प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, लसीकरण सुविधा, औषध वितरण व्यवस्था, प्राथमिक उपचार तसेच आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही.या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण सेवेला मि नेहमी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही कॉंग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी ग्रामस्थांना दिले.
यासोबतच गावात नुतन ग्राम सचिवालय व महिला बचत गट व्यापारी गाळ्याचेही भूमिपूजनही माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी, सरपंच नयुम दफेदार, ग्रामविस्तार अधिकारी मैफूज मणियार,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वै.अधिकरी शिवाजी डुकरे जेष्ठ नागरिक शिवराज शंकरराव पाटील, चिनु पाटील,चेअरमन दत्ता पाटील, माजी उपसरपंच धनराज पाटील,माजी उपसरपंच वैजनाथ पाटील,डॉ.ऋषीकेश पाटील, डॉ.फारुख शेख, डॉ.वर्षा शिंदे,माजी सरपंच सुरेश नवलेकर,पो. पाटील प्र. प्रकाश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष महाजन ढेकळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील,बालाजी पोतदार,बालाजी पाटील टाकळीकर,रितेश गुंडावार, रफिक दफेदार, पत्रकार मुस्तफा पिंजारी,भिमराव पाटील,राजकुमार ढवळे,हारुण शेख, सरोजिनी गोणारकर,के.आर.चव्हाण,छाया नागरगोजे,विशाल बनसोडे,तानाजी सोनार,आमोल बिराजदार,व्हि.एस बादाडे,सुकेशना आळने,बी.बी.चेरलापल्ले,मुद्रुके,जलाल शेख,
माधव पाटील, बाबु पाटील, अहेमद पटेल,गंगाधर तळणे,आसलम दौलताबादी,ईमाजी कुरेशी सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS