नरेंद्र येरावार उमरी मुदखेड मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील पावन भूमीत श्री दत्तात्रय देवस्थान (नागोबागड) येथे मंगळवारी १० नोव्हेंबर ...
मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील पावन भूमीत श्री दत्तात्रय देवस्थान (नागोबागड) येथे मंगळवारी १० नोव्हेंबर २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात भव्यदिव्य ‘आनंद दत्त सत्संग सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीच्या मंगलमय आणि पावन पर्वाचे औचित्य साधून गुरुवर्य अष्टकौशल्य महंत श्री संतोषपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्रातील नामवंत साधू, संत, महंत आणि गुणजन मंडळींची मोठी उपस्थिती लाभणार असल्याने संपूर्ण डोंगरगाव परिसरात सध्या प्रचंड उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे
हिंदू संस्कृतीमध्ये संतांच्या आगमनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. "साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा" या उक्तीप्रमाणे, साधू-संतांच्या चरणस्पर्शाने भूमी पावन होते आणि भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा व भक्तीचा प्रकाश पसरतो. याच उदात्त ध्येयाने आणि भाविकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी या विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन केले आहे.
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या शुभपर्वावर संतांच्या मुखातून निघणाऱ्या ज्ञानरुपी आणि भक्तिरुपी अमृतवाणीचा लाभ परिसरातील भाविकांना व्हावा, या उद्देशाने आयोजकांनी या सोहळ्याचे भव्य नियोजन केले आहे.
संत महंतांच्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी प्रवचनातून तसेच सत्संगातून भाविकांना जीवनाचा खरा मार्ग, धर्माचे आचरण आणि अध्यात्माची गोडी अनुभवता येणार आहे.
संतांच्या या दिव्य उपस्थितीमुळे डोंगरगावची ही भूमी भक्तीच्या आणि ज्ञानाच्या तेजाने उजळून निघणार असून पंचक्रोशीतील हजारो भाविकांसाठी हा एक अलौकिक सोहळा ठरणार आहे.
सकाळी 10:30 वाजता संत महंतांचे आगमन व सत्कार होईल त्यांनतर सत्संग सोहळा सुरू होईल व तद्नंतर भव्य महाप्रसाद होईल. सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री संतसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतिने करण्यात आले आहे. तर परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी डोंगरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS