लातूर: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लातूर शहरातील गांधी चौक आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्या...
लातूर: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लातूर शहरातील गांधी चौक आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यांवर अचानक धाडी टाकल्या. या धडक कारवाईत एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील:
गांधी चौक परिसर: मार्केट यार्ड गेट नं. ४ जवळ प्रिया टी हाऊसबाजूच्या शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर धाड टाकून ९,२८० रुपयांची रोकड आणि ४६,००० रुपयांचे ६ मोबाईल असा ५५,२८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद चौक परिसर: बनसोडे नगरमधील मोकळ्या जागेत चालणाऱ्या मटका अड्ड्यावर कारवाई करत १४,९५० रुपयांची रोकड आणि ३०,००० रुपयांचे ३ मोबाईल असा ४४,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी केली असून, विशेष पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षकांनी अभिनंदन केले आहे.
'खबर' हेल्पलाइनवरून माहिती देण्याचे आवाहन: नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती थेट देण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा 'खबर' हेल्पलाइन क्रमांक सुरू केला असून नागरिकांनी यावर माहिती द्यावी, असे आवाहन श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे

COMMENTS