नरेंद्र येरावार उमरी नांदेड
देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सवंगड्यासह धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य यशस्वी व अविरतपणे करणाऱ्या हिंदूसेवक, युवा उद्योजक सर्जेरावदादा पाटील ढगे यांचा महंत श्री संतोषपुरीजी महाराज चोळाखेकर, परमपूज्य रमेशराज शास्त्री महाराज बिजेगावकर यांनी सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून युवा उद्योजक सर्जेराव पाटील ढगे हे सामाजिक चळवळ राबवत आहेत. त्यांच्या या चळवळीला पंचक्रोशीतील युवा तरुण वर्गांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव उमरी शहरात मोठ्या थाटामाटात आणि राज्यात सर्वात प्रथम साजरा करून तरुणांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या सर्जेराव पाटील ढगे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर साधू संत महंत यांचा देखील त्यांना आशीर्वाद मिळाला आहे. त्या बळावर ते कार्य करत आहेत.
......

COMMENTS