नांदेड जिल्ह्यात कार्यशाळा संपन्न: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. गावांचा कायापालट करण्या...
नांदेड जिल्ह्यात कार्यशाळा संपन्न: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.
गावांचा कायापालट करण्याचा संकल्प: ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास यंत्रणेने गावांचा सर्वांगीण विकास साधत नांदेडला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्याचा निर्धार केला.
महत्त्वाचे उपक्रम: गाव नमुना ८ चे डिजिटलायझेशन आणि कर वसुलीसाठी 'क्यूआर कोड' प्रणालीच्या वापरास प्राधान्य.
उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सन्मान: उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५ ग्रामपंचायतींसह विशेष उपक्रमांसाठी 'सगरोळी' व 'बारड' ग्रामपंचायतींचा गौरव.
नांदेड: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधत नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्याचा ठाम निर्धार जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास यंत्रणेने व्यक्त केला आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील डौर येथील नंदीग्राम पर्यटन केंद्रात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत हा संकल्प करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत अभियानातील निकष व गुणांकनानुसार प्रत्येक गावात नियोजनबद्ध कामे करून ग्रामपंचायतींचा कायापालट करण्याचे आवाहन करण्यात आले.
विकासाभिमुख व डिजिटल प्रशासनावर भर
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी ग्रामपंचायतींना प्रत्येक निकषाचा सखोल अभ्यास करून मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली, डिजिटल प्रशासन आणि लोकसहभाग वाढवण्याचे निर्देश दिले.
कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावपातळीवरील अडचणी मांडल्या. त्यावर चर्चा करताना गाव नमुना क्रमांक आठच्या डिजिटलायझेशनवर आणि कर वसुली अधिक सुलभ करण्यासाठी क्यूआर कोड प्रणालीच्या वापरावार विशेष भर देण्यात आला. यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासोबतच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नवाढीलाही मदत होणार आहे. तसेच, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दुष्काळजन्य परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनाबाबत प्रशासनाला व ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याचे मार्गदर्शन केले.
गौरव आणि पुरस्कारित ग्रामपंचायती:
कार्यशाळेत विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला:
अभियानाच्या पहिल्या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५ ग्रामपंचायती: १. येरगी (ता. देगलूर) २. बोंढार नेरली (ता. नांदेड) ३. वडवणा खडकी (ता. नांदेड) ४. लखमापूर (ता. माहूर) ५. पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर)
सगरोळी (ता. बिलोली): क्यूआर कोड प्रणालीद्वारे प्रभावी कर वसुली पद्धत विकसित केल्याबद्दल.
बारड (ता. मुदखेड): सौरऊर्जेच्या माध्यमातून ९२८ किलोवॅट क्षमतेचा 'सोलार मॉडेल व्हिलेज' उपक्रम राबविल्याबद्दल (या उपक्रमासाठी शासनाकडून १ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे).
ग्रामसेवक संघटनेचे अमृत शिंदे यांनी ग्रामसेवकांच्या वतीने नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करण्याची ग्वाही दिली. या कार्यशाळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS