नरेंद्र येरावार
उमरी /नांदेड
उमरी येथील माॅडर्न इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वर्गणी करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू. 8021 /- निधी पाठविला आहे.सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊसाने दडी मारल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत आपणही मदतीचा हात दिला पाहिजे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे ह्या उदात्त हेतूने माॅडर्न इंग्लिश स्कूल मधिल विद्यार्थ्यांनी निधी संकलित करून रू. 8021 /- चे निधीचा डी. डी. उमरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री.एस. पी. सोलनकर आणि श्री. तेजस कुलकर्णी यांचेकडे सुपूर्द केला. दरवर्षी दिवाळी निमित्त शाळेमध्ये उत्सव साजरा करण्यात येतो. परंतू ह्यावर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असतांना विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्सव साजरा न करता आपल्या फटाक्यासाठीची रक्कम दुष्काळग्रस्तासाठी देऊन आपला खारीचा वाटा उचलत सामाजिक बांधिलकी जोपासली. ह्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कुलकर्णी, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS