नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे सन २०२५-२६ चे 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार' आज (दि. २७ नोव्हेंबर २०२६) शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातील चार गुणवंत शिक्षकांची निवड झाली असून, यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे व प्रवर्ग खालीलप्रमाणे आहेत:
प्राथमिक विभाग: श्री. संतोषकुमार माधवराव पाटील (सहाय्यक शिक्षक, जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव, ता. बिलोली)
माध्यमिक विभाग: श्री. विलास विठ्ठलराव बोरगावे (मुख्याध्यापक, जि. प. हायस्कूल घुंगराळा, ता. नायगाव)
आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक: श्री. शेषराव संभाजीराव पाटील (सहाय्यक शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा नवीआबादी, ता. माहूर)
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका (महिला विभाग): श्रीमती शितल भालेकर (सावळी, ता. बिलोली)
येत्या ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात या सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा शासनाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS