नरेंद्र येरावार उमरी/ कहाळा
नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कहाळा (बुद्रुक) येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत महाराज संस्थानात चंपाषष्ठी उत्सवानिमित्त अभिषेक, आरती, नैवेद्य, मंत्र पुष्पांजली, वेद सेवा, भजन, कीर्तन महोत्सव, अन्नदान, तळीचा कार्यक्रम आदी धार्मिक कार्यक्रमाचे दिनांक 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य श्री निळकंठ महाराज कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंपाषष्ठी उत्सव साजरा केल्या जाणार आहे. किर्तन महोत्सवातील सेवा दिनांक 9 डिसेंबर रोज बुधवार हभप श्री प्रशांत महाराज खानापूरकर, दिनांक 10 डिसेंबर रोज गुरुवार
हभप श्री महेश महाराज वाढवणकर, दिनांक 11 डिसेंबर रोज शुक्रवार हभप वासुदेव महाराज कोलंबीकर, दिनांक 12 डिसेंबर रोज शनिवार हभप सुनील महाराज आष्टीकर, दिनांक 13 डिसेंबर रोज रविवार हभप वासुदेव महाराज अंबुलगेकर, दिनांक 14 डिसेंबर रोज सोमवार हभप श्री राजेश महाराज गुंजर्गेकर, दिनांक 15 डिसेंबर रोज मंगळवार हभप मधुसूदन महाराज कापसीकर याच दिवशी चंपाषष्ठी असल्याने तळीचा कार्यक्रम दुपारी सव्वा दोन वाजता होईल. दिनांक 16 डिसेंबर रोज बुधवार हभप अनिरुद्ध महाराज बा-हाळीकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.
भव्यदिवे अशा कीर्तन महोत्सवात मृदंगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबीकर, गायनाचार्य विष्णू महाराज तांदळीकर, गायक रमेश पाटील खैरगावकर, साईनाथ पाटील खैरगावकर, श्याम देसाई नरंगल, रावसाहेब पाटील रुईकर, बबलू वाकेकर, सुभाष पाटील वाकेकर, मारोती पाटील, पोलीस पाटील संतोष कहाळेकर, बालाजी पाटील हिंदोळा, चांदोबा पाटील करमाळा, शरद पाटील कोलंबी, बाबू पांचाळ घुंगराळा यांच्यासह कहाळा येथील भजनी मंडळीचा सहभाग असणार आहे. डाॅ.धनंजय कहाळेकर यांच्या उपस्थितीत व
गुरुवर्य नीळकंठ महाराज कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंपाषष्ठी उत्सव सर्व सेवेकरी, भक्त मंडळी, शिष्य परिवाराकडून परिश्रम घेण्यात येत आहेत......
.......

COMMENTS