पुणे दि. १७ प्रतिनिधी डॉ. संकेत सावंत आणि डॉ. तनुश्री सावंत यांच्या वाकड, पुणे येथील हॅप्पीदंत डेंटल क्लिनिकचा पाचवा वर्धापनदिन आणि स्वतःच्य...
पुणे दि. १७ प्रतिनिधी
डॉ. संकेत सावंत आणि डॉ. तनुश्री सावंत यांच्या वाकड, पुणे येथील हॅप्पीदंत डेंटल क्लिनिकचा पाचवा वर्धापनदिन आणि स्वतःच्या जागेतील अद्ययावत हॅप्पीदंत डेंटल क्लिनिकचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला. पुण्यातील नामांकित डेंटिस्ट डॉ. विजय फडके यांनी फीत कापून क्लिनिकचे उद्घाटन केले. या वेळी नगरसेविका सौ. स्नेहाताई रणजित कलाटे, नगरसेवक विनायकदादा गायकवाड, डॉ. दिलीप कानडे आणि डॉ. प्रदीप शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संकेत सावंत यांच्या गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेत शिस्त, जिव्हाळा, आपुलकी आणि रुग्णांशी बांधिलकी असल्यामुळे त्यांचे पुणे परिसरात दृढ ऋणानुबंध निर्माण झाले आहेत, अशा शब्दांत डॉ. विजय फडके यांनी डॉ. संकेत सावंत यांच्या समर्पित रुग्णसेवेचा गौरव केला. आता स्वतःच्या जागेत, अद्ययावत साधनसामुग्रीमुळे आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे ही रुग्णसेवा आणखी लोकाभिमुख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी डॉ. विनायक भराटे, डॉ. पल्लवी जामोदकर, प्रशांत टकले, सागर पाटील, ज्ञानेश्वर वांडेकर, डॉ. मनोज वाणी, डॉ. मयूर अंबेकर, डॉ. स्वप्निल खडतरे, डॉ. सागर बोरसे, डॉ. पद्मश्री पाटील, सौ. विजयालक्ष्मी रामोड, रामदास सूर्यवंशी, तुकारामजी जाधव, राजेंद्र परदेशी, जगदेव सोळंके, बालाजी भागानगरे, दीपकशेठ लोणारी, रूपेशशेठ जाधव, सौ. शुभदाताई पोकळे, सौ. वंदनाताई पुणेकर, सौ. मोनिका संदीप ठाकूर, जितेंद्र वेडेपाटील, सुलभा मांजरमकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी डॉ. संकेत आणि डॉ. तनुश्री सावंत यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS