मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
जगदगूरु रामानंदाचार्य श्री नरेन्द्राचार्यजी यांच्या संप्रदायाच्या वतीने भक्तीला श्रमदानाची जोड देत मूखेड तालुक्यातील पाणी शिल्लक असलेल्या नदी, नाल्यावर तब्बल २१७ वनराई बंधारे उभारण्यात आले.
जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संप्रदायाच्या वतीने वर्षात दर महा विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यावेळेस राज्यातील तिव्र कोरडा दूष्काळ पाहता शिल्लक पाणि असलेल्या नदी, नाल्यावर दि ८नोव्हेंबर ते २२नोव्हेंबर या पंधरवाड्यात कच्चे वनराई बंधारे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या योजने अंतर्गत मूखेड तालुक्यात भक्तीला श्रमदानाची जोड देत, धरती, जिवजंतूची तहान भागवण्यासाठी हाती कूदळ, फावडे, पोती, मूखी नाम घेत २१७ कच्चे वनराई बंधारे तयार करण्यात आले.निसर्गाचा समतोल राखणे यासाठी व्रक्ष लागवड व जोपासना, मानवाला रक्ताची गरज भागविण्यासाठी महारक्तदान शिबिरे या सारखं उपक्रम राबविताना जो निसर्गासाठी, धरतीसाठी घाम गाळतो, खरा परमेश्वर निसर्गाच्या संवर्धनात व निस्वार्थ सेवेत आध्यात्म आहे. वाहून जाणारे पाणी बंधा-या च्या माध्यमातून अडवलं व जिरवले जाते. तालुक्यातील तांदळी,राजूरा, बा-हाळी, जाहूर, सावळी, गोजेगाव, गोणेगाव, इडग्याळ, सूगाव, हिब्बट, तूपदाळ, पाळा, बेटमोगरा,दत्तमंदिर मूखेड,होनवडज, सकनूर,बेनाळ, ऐकलारा, येवती या गावातील संतसंघातील भक्तांनी बंधारे उभारले.
तेलंगणा पिठाचे प्रमूख काकासाहेब वनारसे, नांदेड द. जि. अध्यक्ष साहेबराव आहेर, सौ पूजाताई उमाटे, यांच्या माध्यमातून ता अध्यक्ष मारोती ईबितवार, बालाजी चंदावाड, महेश ईगळे, गणेश कळसकर, श्यामाताई मैलापूरे, साईनाथ दाचावार, शिवाजी गवते, तूकाराम सूरनर, अमर स्वामी, दिपक सूनेवाड यांच्या सह असंख्य भक्तांनी परीश्रम घेतले.

COMMENTS