नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड येथील प्राध्यापिका . डॉ. शैला भगवानराव सारंग यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अध्यापक म...
नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड येथील प्राध्यापिका . डॉ. शैला भगवानराव सारंग यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अध्यापक महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम गायकवाड यांच्याकडून प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला.
प्रो. डॉ. सारंग यांना अध्यापन क्षेत्रातील तब्बल ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, या काळात त्यांनी परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक सेवा बजावली आहे. अध्यापनासोबतच उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाचाही त्यांना व्यापक अनुभव आहे. सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड विभाग या पदावर कार्यरत असताना त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडल्या आहेत.
विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व, अभ्यासू वृत्ती आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच संशोधन क्षेत्रातही त्यांचा विशेष व्यासंग असून, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS