जुगार खेळणाऱ्यांकडून 11,400 रुपये आणि बदक छाप पत्ते जप्त किनवट : तालुक्यातील घोटी फाटा ते मलकापूर खेरडा रस्त्यावरील घोटी शिवारात सुरू असलेल्...
जुगार खेळणाऱ्यांकडून 11,400 रुपये आणि बदक छाप पत्ते जप्त
किनवट : तालुक्यातील घोटी फाटा ते मलकापूर खेरडा रस्त्यावरील घोटी शिवारात सुरू असलेल्या तिरट जुगारावर किनवट पोलिसांनी शनिवारी (दि. 31 ऑक्टोबर) सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 11,400 रुपये रोख रक्कम आणि बदक छाप पत्ते जप्त करण्यात आले.
घोटी फाटा ते मलकापूर खेरडा रस्त्यालगत मारोती शिवाजी कदम यांच्या शेतातील टिनपत्राच्या शेडमध्ये काही जण तिरट नावाचा जुगार पैशांची बाजी लावून खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी शंकर मरीबा मानकर (रा. गंगानगर), बालाजी गोविंद राठोड (रा. सरदार नगर), मारोती शिवाजी कदम (रा. घोटी) आणि अभिजित राम कर्हाळे (रा. कमठाला) हे चौघे जुगार खेळताना आढळले.
पोलिसांनी चौघांकडून अनुक्रमे 3,300, 3,100, 2,400 आणि 2,600 रुपये, तसेच बदक छाप पत्ते जप्त केले. या प्रकरणी पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा क्रमांक 323/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सपोउपनि मनिराम आडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डंगवाल करीत आहेत.

COMMENTS