यावर्षीची आवर्षण परिस्थिती बघता सदर दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या नेहमीच्या उपक्रमात कपात करून सायंकाळचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अत्यंत साधेपणाने व दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी संवेदना असलेला हा कार्यक्रम आहे. दिनांक ८ नोव्हेंबर रोजी, सकाळी ५.३० वा.गुरुद्वारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समिती, आणि अशोक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉ.नंदकुमार मुलमुले निर्मित व त्यांचे खुमासदार निवेदन असलेल्या तसेचआंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त दर्जाच्या गायिका श्रीमती मृदुला दाढे यांच्या सुश्राव्य संगीतमैफल सूर दीपावलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध गायक अमोल चव्हाण मुंबई, यांचा सहभाग असून साथ संगत सिंथ:अरविंद इनामदार मुंबई, तबला: राहुल चौगुले मुंबई व इतर यांची असणार आहे.
दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ऋतूंचे रंग सणांचे तरंग या पत्रकार विजय जोशी निर्मित संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. संकल्पना अॅड.गजानन पिंपरखेडे तर निवेदन कवी बापू दासरी यांचे असणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्टार प्रवाह वरील गाजलेल्या छोटे उस्ताद या गायन स्पर्धेची उपविजेती वीरा हाक्के असणार असून, ती सणांवर आधारीत गाणे सादर करणार आहे. संगीत संयोजन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे असून, अमोल मालेगावकर, माधुरी पाटील वाकोडकर, उन्मनी डुघरेकर (बोरीकर), अभिनव पाटील, गणेश हाक्के, आणि विजय बंडेवार हे विविध गीते सादर करणार आहेत. साथसंगत तबला:गजानन कुलकर्णी,कृष्णा बोंपिलवार, सिंथ:गौतम डावरे व राज लांबटिळे, ढोलकी: रविराज भद्रे, ऑक्टोपॅड- गौतम डावरे यांची असणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनात गुरुद्वारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समितीचे शंतनू डोईफोडे, बापू दासरी, अॅड.गजानन पिंपरखेडे, विजय जोशी , चारुदत्त चौधरी, उमाकांत जोशी, सुरेश जोंधळे, लक्ष्मण संगेवार, विजय होकर्णे, वसंत मैय्या, श्विजय बंडेवार, डॉ.नंदकुमार मुलमुले, अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आनंद जवादवार, गिरीश देशमुख यांनी परीश्रम घेतले आहेत.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या दिवाळी पहाट संगीत मैफिलीचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.jpeg)
COMMENTS