नांदेड : भटक्या जमातीतील भोई समाजाच्या विविध न्याय्य व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी भोई स...
नांदेड : भटक्या जमातीतील भोई समाजाच्या विविध न्याय्य व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी भोई समाज महासंघ, विविध सामाजिक संघटना व मच्छीमार समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्या :आरक्षण व महामंडळ : भोई समाजाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा देऊन तोपर्यंत शैक्षणिक व आर्थिक सवलती द्याव्यात तसेच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.पुनर्वसन व मच्छी मार्केट : नांदेड शहरातील चिखलवाडी येथील भोई गल्ली झोपडपट्टीचे तातडीने पुनर्वसन करावे आणि प्रत्येक जिल्हा व तालुक्यात मासेविक्रीसाठी स्वतंत्र जागा व मच्छी मार्केट उपलब्ध करून द्यावे.
मच्छीमारांसाठी कायदा व सवलती : पारंपरिक मच्छीमारांसाठी स्वतंत्र कायदा करावा, कृषी क्षेत्राप्रमाणे सवलती द्याव्यात आणि जलसंपदा विभागाची नवीन ठेका/लिलाव पद्धत रद्द करून संस्थांना प्राधान्य द्यावे.
स्मारके व वसतिगृह : वीर शहीद बालाजी डुबुकवाड (वाचोटी, कंधार) व वीर शहीद नरसिंह जिलेवाड (मुदखेड रोड, भोकर) यांच्या स्मारकांसाठी जागा मिळावी, तसेच संत आमा भोई स्मारक, वसतिगृह व अभ्यासिकेसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी.
शासनाने आगामी हिवाळी अधिवेशनात या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

COMMENTS