नरेंद्र येरावार उमरी प्रतिनिधी
उमरी शहरातील संतकवी दासगणु शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरूवारी संविधान दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन सामूहीक शपथ घेण्यात आली. संविधान प्रदर्थनीचे उदघाटन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य जे.एल.गायकवाड होते. प्रमुख वक्ते म्हणून नुतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ए. एस. जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे माजी राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी नरेंद्र येरावार यांची उपस्थिती होती.
मान्यरांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे राजा असो वा रंक सर्वजण कायद्यासमोर समान आहेत. समता स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्येकाला समान हक्क, शिक्षणाचा हक्क, बोलण्याचा हक्क, धर्माचा हक्क दिला आहे. त्यामुळे संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा असल्याचे सांगून भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गटनिदेशक मनिष परदेशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व निदेशक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
.......
..........

COMMENTS