वर्धा, विशेष प्रतिनिधी:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा तसेच न्यू सेपक टकरा असोसिएशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धा (सन २०२६-२७) उत्साहात पार पडली. दिनांक २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील आठही विभागांतून १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली गटांचे एकूण ४२ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम आणि जिल्हा सेपक टकरा संघटनेचे सचिव डॉ. विनय मून आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण व निवड चाचणी
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम, डॉ. विनय मून, तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे व गणेश यालावार, तसेच शिवछत्रपती पुरस्कारार्थी हनुमंत लुंगे आणि श्रीमती संजली वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा जाधव यांनी केले, तर संदीप खोब्रागडे यांनी आभार मानले.
तसेच, या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या महाराष्ट्र राज्य संघाची निवड करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात आली. निवड समितीमध्ये गणेश माळवे (परभणी), डॉ. विनय मून (वर्धा), रवी बकवाड (नांदेड), मनोज बनकर (छत्रपती संभाजीनगर), रामदेव बालपांडे, लेखांशू लाडके आणि ईशान सागर यांचा समावेश होता. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रीडा अधिकारी दर्शन हस्ती, अनिल निमगडे, श्रीमती सायली चक्रवार, विश्वास बोकेडे, रवी काकडे, योगेश कुलकर्णी, अशोक पेठेकर, नाना टेकाम व जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल (गटनिहाय)
१४ वर्षांखालील मुले:
प्रथम: इंग्लिश स्कूल, मंगळवेढा, जि. सोलापूर (पुणे विभाग)
द्वितीय: नवजीवन डे स्कूल, नाशिक (नाशिक विभाग)
तृतीय: लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल, मंत्री नगर, नांदेड (लातूर विभाग)
१४ वर्षांखालील मुली:
प्रथम: कस्तुरबा कन्या शाळा, अमरावती (अमरावती विभाग)
द्वितीय: माध्यमिक आश्रम शाळा, येड्राव खुर्द, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर (पुणे विभाग)
तृतीय: महर्षी शिंदे विद्यालय, एनकुळ, जि. सातारा (कोल्हापूर विभाग)
१७ वर्षांखालील मुले:
प्रथम: सेंट पॉल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हुडकेश्वर, नागपूर (नागपूर विभाग)
द्वितीय: बून इंग्लिश स्कूल, छत्रपती संभाजीनगर (छत्रपती संभाजीनगर विभाग)
तृतीय: नवजीवन डे स्कूल, नाशिक (नाशिक विभाग)
१७ वर्षांखालील मुली:
प्रथम: इंग्लिश स्कूल, मंगळवेढा, जि. सोलापूर (पुणे विभाग)
द्वितीय: क्राइस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरखैरणे, नवी मुंबई (मुंबई विभाग)
तृतीय: ऋषी विद्या एज्युकेशन स्कूल, जालना (छत्रपती संभाजीनगर विभाग)
१९ वर्षांखालील मुले:
प्रथम: जी. आर. काबरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चांदूरबाजार, जि. अमरावती (अमरावती विभाग)
द्वितीय: एन. ई. एस. ज्युनिअर सायन्स कॉलेज, नांदेड (लातूर विभाग)
तृतीय: बी. वाय. के. कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक (नाशिक विभाग)
१९ वर्षांखालील मुली:
प्रथम: इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मंगळवेढा, जि. सोलापूर (पुणे विभाग)
द्वितीय: एच. पी. टी. कला आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक (नाशिक विभाग)
तृतीय: लोटस इंग्लिश स्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती (अमरावती विभाग)
छायाचित्र ओळ (Photo Caption): वर्धा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघाला चषक प्रदान करताना मान्यवर.

COMMENTS