अर्जापूर (प्रतिनिधी)
पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व व काव्यवाचन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या विविध स्पर्धांचे परीक्षण महाविद्यालयातील प्रा. साहेबराव सोनकांबळे व प्रा. शैलेश उल्लेवार यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, तसेच मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान व आस्था निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
विविध स्पर्धांच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गोविंद चौधरी होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव बेलखेडे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. देविदास जाधव, डॉ. शंकर मरकले, डॉ. मोहसिन खान, प्रा. योगाजी पवारे, प्रा. मारोती सोनकांबळे, प्रा. गौतम कांबळे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा. डॉ. नारायण शिवशेट्टे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. शैलेश उल्लेवार यांनी मानले

COMMENTS