अर्जापूर (प्रतिनिधी):
हु.गो.पा.शि.प्र.मं.संचलित,पानसरे महाविद्यालयात गुरुवार, दि.१ ऑक्टोबर रोजी इयत्ता ११ वी आणि १२ वी (कला, वाणिज्य आणि विज्ञान) शाखेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला 'पालक मेळावा' मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा.श्री सुभाषराव गायकवाड साहेब हे होते. कार्यक्रमाची सुरुवात हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा - हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या प्रतिमा पूजनाने पालक मेळाव्याची सुरुवात केली आहे. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले आहे. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.डॉ.शुध्दोधन गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून या पालक मेळाव्याची भूमिका व मुख्य उद्दिष्टे अतिशय प्रभावीपणे मांडली. तसेच वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेत भविष्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे धोरणे यावर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थित पालकांमधून श्री गंगाधर पापुलवार व श्री आत्माराम देगावे यानी मनमोकळा संवाद साधत महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध व सुसंस्कारित वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य प्रा.डॉ.महादेव बेलखेडे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन
महाविद्यालयाचे करते वेळेस म्हणाले की , 'विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील' असे आश्वासन व ग्वाही दिली. यावेळी मंचावर संस्थेचे संचालक श्री माधवराव महापाटील माचनूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व पालकांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीला प्रत्यक्ष भेट देऊन आधुनिक वर्गखोल्या व अद्ययावत सुविधांची पाहणी केली. तसेच, विषय शिक्षकांशी थेट संवाद साधून आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे अतिशय ओघवत्या आणि प्रभावी शैलीत सूत्रसंचालन प्रा.शिवकुमार सरकोंडावार यांनी , तर कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व पालंकाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. गोविंद चौधरी यांनी मानले आहेत.

COMMENTS