वासवी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्हचा विस्तार राज्यात करणार - अध्यक्ष गोविंदराव बिडवई यांचे प्रतिपादन

  नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...... महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती.... .............नरेंद्र येरावार  ...

 


नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न......

महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती....

.............नरेंद्र येरावार 

....उमरी प्रतिनिधी 

सर्व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वासवी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा विस्तार लवकरच महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष गोविंदराव बिडवई यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेला महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नांदेड येथील वासवी भवन, सिडको रोड येथे बुधवारी वासवी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्हची 

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.

सर्व समाजातील छोट्या व्यापाऱ्याला, महिला बचत गटाला आणि तरुण उद्योजकाला साथ द्यायची असेल तर आपली स्वतःची आर्थिक संस्था मजबूत असली पाहिजे. वासवी अर्बनच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात बहुतांश कुटुंबांना उभे करित आहोत. 

आता हा विस्तार महाराष्ट्रात करण्याचा आमचा मानस असल्याचा संकल्प अध्यक्ष गोविंदराव बिडवई व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार या दोघांनीही केला आहे. त्यास उपस्थिती सर्व सभासदांनी पाठिंबा दिला. सर्व समाजातील 

व्यापाऱ्यांसाठी सुलभ कर्ज योजना नवीन दुकान, व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदरात उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण, महिलांसाठी वासवी महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग कर्ज आणि प्रशिक्षण, तरुणांसाठी स्टार्टअप मदत समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ, प्रत्येक जिल्ह्यात शाखा पुढील काही वर्षांत राज्यातील प्रमुख जिल्ह्यात वासवी अर्बनच्या शाखा उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यावेळी पूढे बोलताना महासभेचे महासचिव तथा वासवी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्हचे अध्यक्ष गोविंदराव बिडवई म्हणाले की, वासवी अर्बन ही केवळ पतसंस्था नसून सर्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सक्रिय आहोत. 

या बैठकीत समाजातील अनेक व्यापाऱ्यांनी, सभासदांनी, संचालकांनी वासवी अर्बनच्या कार्याचे कौतुक करून विस्ताराला पाठिंबा दर्शविला.

समाज बांधवांनी एकत्र येऊन आपली आर्थिक संस्था बळकट केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असा विश्वास महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार व्यक्त करण्यात आला.

यावेळी एकनाथराव मामडे, नंदकुमार मडगुलवार, सदानंद मेडेवार, विजयकुमार कुंचनवार ,शंतनू कोडगिरे, विजय पांपटवार, अनिल मनाठकर, राजु शेठ मोतेवार, शंकर देबडवार, 

प्रदीप मनाठकर, नरेंद्र येरावार, साईनाथ मेडेवार, सतीश मेडेवार, गजानन चौधरी, पवन गादेवार, सतीश लोकमनवार, प्रल्हाद काशेटवार, विजयकुमार बंडेवार,मॅनेजर नरेश मुक्कावार, प्रितेश देवसेटवार यांच्यासह वासवी अर्बनचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते...

......

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group