
पत्रकारांच्या निवेदनानंतर गडकरींचे ठोस आश्वासन; माहूरमधील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणारश्रीक्षेत्र माहूर
श्रीक्षेत्र माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-अ वरील बहुतांश विकासकामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने अखेर हा प्रश्न थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात पोहोचला आहे. माहूरच्या विकासकामांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या स्थानिक पत्रकारांच्या शिष्टमंडळाने ४ ऑक्टो. रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी महामार्गावरील सर्व रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे ठोस आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.
पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनात महामार्गावरील बंद अवस्थेतील पथदिवे, अपूर्ण नाली बांधकाम, प्रलंबित पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्त्यांची अपूर्ण जोडणी तसेच मालवाडा घाटातील रखडलेली कामे यांसह अनेक गंभीर समस्यांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. अनेक वर्षांपासून या कामांचा प्रश्न प्रलंबित असून, वारंवार मागणी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गाची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.माहूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने दखल घेतली. महामार्गावरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, अपील बेलखोडे, सुरेश गिऱ्हे, राज ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे आणि नवनीत देवपूलवार उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
पत्रकारांच्या निवेदनानंतर गडकरींचे ठोस आश्वासन; माहूरमधील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणारश्रीक्षेत्र माहूर श्रीक्षेत्र माहूर शहरातू...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड...
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पोलीस उप महानिरीक्षक व पोलिस अधीक्षकांना निवेदन नरेंद्र येरावार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड:( दि. ५ ऑक्टोबर २०२६) महाराष्ट्र राज्य वेटरन्स एक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित २७ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नांदेड...
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पोलीस उप महानिरीक्षक व पोलिस अधीक्षकांना निवेदन नरेंद्र येरावार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगा...
-
नांदेड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...... महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती.... .............नरेंद्र येरावार ...
-
महिला सक्षमीकरणासाठी कवळे गुरुजींच्या उपक्रमांना नारीशक्तीची जोड; सहकारातून स्वावलंबनाचा संदेश *नरेंद्र येरावार* उमरी/नांदेड : सहकार क्षे...
COMMENTS