नांदेड : प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाच...
नांदेड : प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी ॲड. शेख यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
यावेळी ॲड. शेख यांनी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करावी, आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि आपत्तीनंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपत्तीच्या प्रसंगी तातडीने निर्णय घेणे, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे तसेच बचाव व मदतकार्यामध्ये स्वयंसेवकांची भूमिका याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ समाजसेवेपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संकटसमयी मदतीची भावना निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS