शेतकऱ्यांनो एकी दाखवा, संयम ठेवा यंदा उसाला सोन्याचा भाव मिळेल* -शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले

नांदेड - यावर्षी पावसाळा कमी झाल्याने सर्वत्र उसाची कमतरता निर्माण झाली आहे तसेच जागतिक बाजारात साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने येणाऱ्...


नांदेड - यावर्षी पावसाळा कमी झाल्याने सर्वत्र उसाची कमतरता निर्माण झाली आहे तसेच जागतिक बाजारात साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या उसाला सोन्याचा भाव मिळेल पण त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस तोडण्याची घाई न करता साडेचार ते पाच हजाराचा भाव देईल त्याच कारखान्याला ऊस देणार अशी भूमिका घ्यावी. रसवंती किंवा चाऱ्याला ऊस दिला तरी किमान सहा हजारापर्यंत दर मिळू शकतो कारखान्याने भाव जाहीर केल्याशिवाय त्याला ऊस द्यायचा नाही अशी भूमिका घ्यावी असे आवाहन शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे मा. सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

 नैसर्गिक संकट असो किंवा सुलतानी संकट असो शेतकऱ्यांना काही नवे नाही. संकटकाळातच काहीतरी चांगला मार्ग काढता येतो त्यानुसार शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवून एकी दाखवली तर आहे त्या उसाच्या टिपऱ्याला सोन्याचा भाव मिळवता येईल. पाऊस कमी असला तरीही शेतकऱ्यांनी ऊस देण्याची घाई करू नये कारखान्याची संख्या व उपलब्ध असलेला ऊस पाहता ऊस नेण्यासाठी कारखानदारात मोठी स्पर्धा होणार आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासारखे काही मोठे राजकीय कारखानदार मोठ- मोठ्या गप्पा मारून शेतकऱ्याचा ऊस नेण्याचा प्रयत्न करतील शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्याला बळी न पडता जो कारखानदार जास्त दर देईल त्यालाच ऊस देण्याची स्पष्ट भूमिका घ्यावी . यावर्षी जागतिक बाजारपेठेत साखरेचे वाढलेले दर व कमी ऊस यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तो दर मिळवून घेता येऊ शकतो पण त्यासाठी थोडा संयम ठेवून एकी दाखवणे गरजेचे आहे. यावर्षी उन्हाळा जास्तच कडक होणार असल्याने रसवंतीला किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस दिला तरीही सहा हजार रुपयांपर्यंत आपल्याला निश्चितच दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखानदारांना ऊस देण्याची घाई करू नये. आपल्या आहे त्या उसाला सोन्याचा भाव मिळवायचा असेल तर कारखाना कोणताही असो उसाचा दर जाहीर केल्याशिवाय कोणीही कारखान्याला ऊस द्यायचा नाही अशी भूमिका ऊस उत्पादकांनी घ्यावी असे आवाहन शिवसेना प्रणित शेतकरी सेनेची प्रदेश सरचिटणीस तसा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group