उमरी /नरेंद्र येरावार
लोहार समाजाकडे शासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षा बाबत लक्ष वेधण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रभरातून पंढरपूर येथे दाखल झालेल्या समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत, सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्य समिती च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष दादासाहेब कळसाईत यांच्या नेतृत्वाखाली, 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त या आंदोलनाला प्रारंभ झाला आहे.
या आक्रमक आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यभरातून हजारो लोहार समाज बांधव पंढरपुरात एकत्रित झाले, लोहार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात प्रशासनाला जागे करण्यासाठी, पंढरपूर येथील श्री संत नामदेव महाराज पायरी पासून, ते थेट तहसील कार्यालयापर्यंत लोहार समाजाचा भव्य महामोर्चा दिनांक 2 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला. यात महाराष्ट्रभरातून हजारो लोहार समाजबांधव उपस्थित झाले होते. यात ज्येष्ठ नेते अनिल बसव, विलास आव्हाड, समितीचे कार्याध्यक्ष महेश लोहार, उपाध्यक्ष यशवंत कळसाईत, अखिल भारतीय लोहार समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पखाले, संजय कळमबेकर, अर्जुनाआप्पा टिंगरे, यांच्यासह नांदेड लोहार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर आनंदराव कळसे राहेरकर, ज्येष्ठ नेते मारोतराव तिरकसवाडीकर, त्र्यंबक पोफळे, संदीप सूर्यवंशी, दशरथ कळसे, राजेश देशमुख कंधारकर, परसराम सूर्यवंशी कापशीकर, आधी शेकडोच्या संख्येने लोहार समाज बांधव उपस्थित होते. लोहार समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सुरुवात झालेल्या या आंदोलनामुळे पंढरपूरमधील महामोर्चात लोहार समाज बांधवांची एकजूट वज्रमूठ ठळकपणे दिसून आली.

COMMENTS