माहूर तालुक्यात पहिल्यांदा दारूबंदी बाबत होणार ऐतिहासिक निर्णय श्रीक्षेत्र माहूर। इलियास बावाणी माहूर माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद य...
माहूर तालुक्यात पहिल्यांदा दारूबंदी बाबत होणार ऐतिहासिक निर्णय
श्रीक्षेत्र माहूर। इलियास बावाणी माहूर
माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे अजनी व वझराच्या महिलांनी ऐतिहासिक निर्णय घेत दारूबंदी करण्याचा ठराव घेतला यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता परंतु दारू दुकानदारांनी वझरा आणि अंजनीच्या गावातील नागरिकांमध्ये वाद पेटवून या ऐतिहासिक आंदोलनापासून अजनीच्या महिलांना दूर ठेवले तरीही मौजे वझरा येथील महिलांनी न डगमगता पुढील प्रक्रिया पूर्ण करून दि 8 रोजी ऐतिहासिक मतदान करून दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने वजरा येथील महिलांच्या धाडसाचे कौतुक होत आहे
मौजे वझरा शेख फरीद या तीर्थक्षेत्र असलेल्या गावात दारू दुकाने बियर बार थाटली गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत घराघरात भांडणे सुरू झाली होती तसेच अंजनी गावातही यामुळे महिलांना प्रचंड त्रास होत होता तर तीर्थक्षेत्र शेख बाबा दर्गाह येथे हजारोच्या संख्येने येणारे भाविक आणि पर्यटकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामुळे त्या दोन्ही गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी विरोधात आंदोलन पुकारले होते याची दखल प्रामुख्याने दैनिक एकमत नेही अनेक वेळा घेतली होती त्यामुळे दारू दुकानदारांनी एकी करून मौजे अजनी च्या महिला व गावकऱ्यांना या आंदोलनापासून दूर केले परंतु मौजे वझरा येथील अनेक गावकऱ्यांनी महिलांना छुपा पाठिंबा देत हा लढा पुढे रेटला संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तहसीलदार अभिजीत जगताप यांनीही महिलांना नियमानुसार साथ दिल्याने आंदोलन अंतिम टप्प्यात आले असून दि 8 रोजी दारू दुकाने सुरू राहणार की बंद होणार याचा अंतिम फैसला होणार आहे
वझरा शेख फरीद येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता मतमोजणी सुद्धा होणार आहे यासाठी तहसीलदार अभिजीत जगताप यांनी पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यासह नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांचेसह मंडळ अधिकारी शंकर चंदनकर ग्राम महसूल अधिकारी अभिजीत कुडमते ओमप्रकाश तवर श्रीमती सुजाता गवले श्रीमती ममता गेडाम श्रीमती प्रियंका डुकरे महसूल सेवक बंडू चिरंगे कैलास खूपसे यांची नियुक्ती केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुंभार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास चोपडे हे कडक बंदोबस्त ठेवणार आहेत

COMMENTS