नांदेड: प्रतिनिधी श्री सत्संग सेवा समिती, नांदेड तर्फे पुण्यनगरी नांदेडमध्ये ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘गुरुमहिमा सत्संग’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात अनंतश्री विभूषित महामंडलेश्वर प.पू. मां कनकेश्वरी देवीजी आपल्या अमृतवाणीने उपस्थितांना गुरुमहिमा सांगणार आहेत.
कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ ते शनिवार, १० ऑक्टोबर २०२६
वेळ: दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत
स्थान: डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड.
१० ऑक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन:
कथा समाप्तीनंतर शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसादाचे सौजन्य श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प.पू. मां कनकेश्वरी देवीजींविषयी:
प.पू. श्री केश्वानंदजी बापू यांच्या कृपाशिष्या प.पू. मां कनकेश्वरी देवीजी यांचा जन्म गुजरातमधील मोरबी शहरात झाला. त्यांनी १९८६ मध्ये 'श्री शंभु पंचअग्नि आखाडा' येथे दीक्षा घेतली. गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात या आखाड्यात दीक्षा घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत ६०० हून अधिक कथा संपन्न केल्या असून, उज्जैन येथील २०१६ च्या महाकुंभात त्यांना महामंडलेश्वर पदाने सन्मानित करण्यात आले आहे.
आयोजक व निमंत्रक:
या कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री प्रकाशराव बाबारावजी देशमुख तरोडेकर (कै. बाबाराव नागाराव देशमुख आणि कै. सुंदराबाई बाबाराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ) हे असून श्री सत्संग सेवा समिती, सालासर भजन मंडळ, एकता मित्र मंडळ, नवामोंढा व्यापारी मित्र मंडळ व इतर मान्यवरांनी या पुण्यसोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमास शंकर नागरी सहकारी बँक लि. नांदेड (नवा मोंढा) यांचे सौजन्य लाभले आहे.

COMMENTS