लोहा /प्रतिनिधी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व भविष्यात पाऊसाचे प्रमाण वाढण्यासाठी बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक भाईजी यां...
लोहा /प्रतिनिधी
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व भविष्यात पाऊसाचे प्रमाण वाढण्यासाठी बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक भाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा शहरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम लोहा शाखेच्या वतीने होत आहे हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन लोहा न.प.चे जेष्ठ हरिभाऊ चव्हाण यांनी लोहा येथे बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक भाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम केले.
लोहा येथील सिध्देश्वर महादेव मंदिरात दि. २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक भाईजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा कोमलताई झंवर, सर व्यवस्थापक कैलास कासट, यांच्या प्रेरणेने व विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा अर्बन बँक शाखा लोहा च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे संतुलन राखा असा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोहा न.प.चे उपनगराध्यक्ष करीम शेख मुजावर, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक केशवराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष दता भाऊ वाले, जेष्ठ नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, माजी नगरसेवक शिवाजीराव आंबेकर,नगरसेवक गणेश पाटील बगाडे, मल्लिकार्जुन शेटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भिमराव पाटील शिंदे,जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष संगेवार, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे,पत्रकार विलास सावळे, संजय कहाळेकर ,प्रदिप कांबळे, शिवराज पाटील पवार, गोविंद पाटील पवार,विनोद महाबळे, गजानन दांगटे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम सिध्देश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सिध्देश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना हरिभाऊ म्हणाले की बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक भाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा अर्बन बँकेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात . सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.वृक्ष लागवड करुन ते जोपासले पाहिजे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे त्यांना अभिवादन करतो व बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक राधेश्याम चांडक भाईजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि लोहा येथील बुलडाणा अर्बन बँकेचे मॅनेजर केशवराव शेटे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो असे नगरसेवक हरिभाऊ चव्हाण म्हणाले.
यावेळी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहा येथील बुलडाणा अर्बन बँकेचे मॅनेजर केशवराव शेटे, जयराम पांचाळ, प्रविण कदम , ओमप्रकाश सोनवळे ,गणेश मिरकुटे, ऋषिकेश खरात,सौ.जयश्री बुरसे मॅडम, अंकुश गिते या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पत्रकार विलास सावळे यांनी केले तर आभार बुलडाणा अर्बन बँकेचे मॅनेजर केशवराव शेटे यांनी मानले.

COMMENTS