नांदेड :(दि. ३ सप्टेंबर २०२६)
अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान, जय किसान ही उदघोषणा करणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि जबाबदार नागरिकत्वाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाविद्यालय परिसरातील स्वच्छता व परिसर सुशोभीकरणासाठी श्रमदान केले तसेच विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधींचे जीवन,कार्य, विचार आणि सामाजिक योगदान याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. रत्नमाला म्हस्के, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, ओम आळणे, प्रभू यांनी सहकार्य केले.

COMMENTS