दोन तीन दशकापूर्वी ग्रामीण भागात लोक तोला मोलाचं आणि विकासाचं राजकारण करायचे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने शासन राबवत असलेल्या योजना प्रभावीपणे राबवून गावचा विकास, गावातील लोकांचा विकास करीत असत. विरोधकही तेवढ्याच हिमतीने विकास कामासाठी विरोध करीत विकास साधत धन्य मानत. अशा प्रकारच्या राजकारणातून गावचा परिपूर्ण विकास होत होता. त्यामुळे ती राजकारणी लौकिकास पात्र ठरत असत. अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे माजी सरपंच व विद्यमान सरपंच प्रतिनिधी विनायक आडे हे एक आहेत.गेल्या दोन दशकापासून राजकारणात यशस्वी वाटचाल करीत मल्लापूर या गावचा चेहरा मोहरा बदलला. त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देणारा हा लेख.....
श्री. विनायक पांडुरंग आडे यांचा जन्म दि............. रोजी मल्लापूर ता. उदगीर जि. लातूर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच पण शिक्षण घेण्याची जिद्द असल्यामुळे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय मुखेड जि. नांदेड येथे घेतले.शिक्षण संपल्यावर ते सामाजिक व राजकीय कार्याकडे वळले. श्री. आडे यांना लहानपनापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे लोकांची कामे करीत करीत ते राजकारणाकडे वळले. आपल्या गावातील एक तरुण हा उच्च शिक्षित आहे आणि तो लोकांची कामे करतोय. म्हणून गावातील लोकं आपल्या समस्या व विकासासाठी विनायकरावाकडे पाहू लागली. विनायकरावानी सुरुवातीला गावातील लोकांना शासनाच्या योजना कशा मिळवून देता येतील यासाठी प्रयत्न करू लागले. इंदिरा गांधी निराधार योजना,
संजय गांधी निराधार योजना त्या त्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू लागले. आपली कामे करून घेण्यासाठी गावातील लोकं विनायकरावाना भेटू लागले.विनायकरावांनीही त्या प्रत्येकाना त्या त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.गावातील लोकांना खात्री पटली की हा व्यक्ती गावचा सरपंच झाला तर गावचा खूप विकास करू शकतो आणि झालेही तसेच श्री. विनायक आडे यांनी राजकारणाकडे वळावं व राजकारणाच्या माध्यमातून लोकांची कामे करावी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावा असं लोकांना वाटू लागलं. श्री. विनायक आडे हे राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते सक्रिय सदस्य म्हणून काम करतात. या माध्यमातून ते लोकांची कामे करीत राहिले. आणि गावातील लोकांनी 2004 मध्ये गावच्या सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली.2004 पासून ते आजतागायत सरपंच पद त्यांच्याकडे आहे. फक्त एक टर्म अनुसूचित जातीसाठी राखीव होते तो कालावधी सोडून ते सरपंच म्हणून अनेक विकासाची कामे केली. गावातील मूलभूत सुविधा बरोबरच लोकांसाठीच्या हक्काच्या योजना त्यांनी लोकांना मिळवून दिल्या. गावात विकासाच्या योजना प्रभाविपणे राबविल्या. गावातील अंतर्गत रस्ते, जलसिंचन योजने अंतर्गत घर तेथे नळ, वाटर फिल्टरचे पाणी, शेतरस्ते, शौचालय, व्यक्तिगत विहिरी, शेत तळे, वृक्षलागवड, गाय गोठा, घरकुल योजना अशा शासनाच्या योजना गावात प्रभावीपणे राबविल्या.तांडा वस्ती, दलित वस्तीमध्येही त्यांनी भरपूर कामे केली. गावामध्ये व तांड्याला नवीन डीपी मंजूर करून घेतला. रस्ते, नाल्या, वीज व पाणी याबाबतीत हे गाव परिपूर्ण समाधानी आहे. गावातील मुलांना जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळा डिजिटल बनविली. शाळेतील व विदयार्थ्याच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. अशा विविध विकास कामामुळे मल्लापूर हे गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आलेले आहे.श्री. विनायकराव आडे यांनी शासनाच्या योजना गावासाठी आणण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्याशी जवळीक साधून त्या योजना खेचून आणल्या. तसेच माजी मंत्री आ. संजय बनसोडे साहेबांनी विकासनिधी देवून गावच्या विकासासाठी श्री. विनायकराव यांना काम करण्यास प्रोत्साहित केले. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बरोबरच ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, विरोधक यांनीही विकासासाठी त्यांना साथ दिली. म्हणून मल्लापूर गावचा विकास त्यांना करता आला. माजी सरपंच व विद्यमान सरपंच प्रतिनिधी श्री. विनायकराव आडे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊया!
*शंकर बोईनवाड*
पत्रकार, उदगीर


COMMENTS